महत्त्वाच्या बातम्या

हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी भास्कर नलवडे, उदय माने व्हा. चेअरमन म्हणून निवड

 माल्हारपेठ : ता. पाटण येथील हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी भास्कर नलवडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी उदय माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नावडी येथील हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटातील सर्वच्या सर्व १३ उमेदवारांनी विजय मिळवला .या निवडणुकीनंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व संचालकांच्या बैठकीत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड करण्यात आली. यामध्ये भास्कर गधुरान नलवडे (नावडी) यांची चेअरमन पदासाठी व खिलारवाडी येथील उदय बाळकृष्ण माने यांची व्हाईस चेअरमन पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहकारी संस्था, पाटण गीतांजली कुंभार यांनी जाहीर केले.

      लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडरंग नलवडे.यांनी हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्थेची झालेली निवडणूक सर्व सभासदांमधून खेळीमेळीत व शांततेत पार पडल्याने सर्व सभासद, नवनिर्वाचित पदाधिकारी, संचालक मंडळ व निवडणूक प्रक्रिया उत्तम व चांगल्या पद्धतीने शांततेत पार पाडल्याबद्दल अधिकारी गीतांजली कुंभार यांचे आभार मानले.             

     निवडणू‌क प्रसंगी पाणीपुरवठा फेडरेशनचे तालुका अध्यक्ष बबनराव नलवडे, नावडी सोसायटीचे चेअरमन बापूराव नलवडे, माजी संचालक मानसिंगराव नलवडे, नावडी वसाहत ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष पवार, साखर कारखान्याचे सेवानिवृत ज्येष्ठ कर्मचारी नथुराम नलवडे, पाणी पुरवठ्याचे सचिव संतोष शेजवळ, सहसचिव अमित पवार, सहाय्यक सुधाकर नलवडे, अधिकराव पवार, आनंदराव काळे, विलासराव नाने, भीमराव माने, विलासराव पाटील, बरिंद पाटील, विनोद माने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!