महत्त्वाच्या बातम्या

हरपळवाडी ता कराड येथे मूलभूत सोयींचा अभाव; रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलनाचा ईशारा

 मौजे हरपळवाडी ता.कराड येथे गावातील मातंग वस्तीत मूलभूत सोय सुविधा यांचा नेहमी अभाव आहे. अनेक वेळा ग्रामस्थांच्या वतीने मूलभूत सुविधांची मागणी करुन फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात अशी अवस्था आहे. सदर ग्रामपंचायती मध्ये अंधाधुंदी कारभार सुरु आहे. लोकांना मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे.  तसेच  पोलिस पाटील यांचे निधन झाले    व त्यांचा अंत्यविधी पायरीवर करावा लागला यामुळे मृतदेहाची अवहेलना होत असल्यामुळे सदर बाब गंभीर आहे. सदर स्मशान भूमितील अंत्यविधी च्या जागेवरील जाळी बसवण्यास गेली सात आठ महिने पाठ पुरावा करुन ग्राम सभेत ठराव घेऊनही अखेर जाळी बसविण्यात आली नाही त्यामुळं अंत्यविधी कुठे करायचा हा प्रश्न उपस्थित होत असतो. जाळी बसवण्यासाठी निधी नाही का यांचा खुलासा ग्रामपंचायतीने  करावा. गेल्या ५ वर्षामध्ये शासन, जिल्हा, स्तरावरुन आज अखेर मातंग वस्ती सोयी सुविधा विकास कामे, दलित वस्ती सुधार योजना समाज कल्याण १३,१४,१५,वित आयोग तसेच विविध हेड मधून निधीमधून कोन कोणती कामे झाली तसेच त्या निधीतून झालेल्या कामाची खाते निहाय मार्फत चौकशी करावी. कर्तव्य शून्य ग्रामपंचायत सरपंच आणि जातीयवादी ग्रामसेवक यांच्या संपूर्ण कामकाजाची सखोल चौकशी  करावी. तसेच जातीयवादी प्रवृत्ती ने वागाणाऱ्या सदर ग्राम सेविका यांच्या वर ऍट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करुन त्यांना पाठीशी घालणाऱ्या विस्तार अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष आयु.किरण बगाडे यांच्या आदेशाने तसेच युवक जिल्हाध्यक्ष आयु.सोमनाथ धोत्रे यांच्या नेतृत्वमध्ये लोकशाही सनदशीर मार्गाने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!