महत्त्वाच्या बातम्या

हिंदू मुस्लिम समाजात तेड निर्माण करणारी घटना; महिमानगड किल्ल्यावरील दर्ग्याची समाजकंटकाकडून मोडतोड 

      माण तालुक्यातील ऐतिहासिक महिमानगड किल्ल्यावरील मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले पीर साहेब दर्ग्याची समाजकंटकांनी मोडतोड केली असल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. महिमानगड ( ता. माण ) येथील किल्ल्याच्या पायथ्याशी मुस्लिम समाजबांधव मोठ्या प्रमाणात आहेत. या मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पीर साहेब बाबा यांची दर्गा किल्ल्यावर शिवकालीन युगापासून आहे मात्र  बुधवार दि.२९ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खटाव तालुक्यातील पांगरखेल येथील समाजकंटक १)सिद्धेश धर्मेंद्र जगताप(वय २१)

२) जय राजेंद्र जगताप 

   (वय १९)

३) अतुल चंद्रकांत जगताप 

    ( वय २२)

४) शुभम शशिकांत जगताप 

      ( वय २७)

५) नवनाथ किसन जगताप 

    ( वय २६)

६) जीवन सदाशिव जगताप

    ( वय ३३)

 सर्वजण राहणार पांगरखेल तालुका खटाव येथील असून यांनी जाणून-बुजून दर्ग्याचे नुकसान करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे सदर ६ जणांच्या विरोधात सरकारतर्फे फिर्याद नोंद केलेली आहे.

 सपोनि. दत्तात्रय दराडे यांनी १२ तासाच्या आत सर्व संशयितांना केली अटक

    सदर गुन्ह्याची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि. दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून या प्रकरणातील सर्व आरोपींना बारा तासाच्या आत अटक केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी काटेकोरपणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!