महत्त्वाच्या बातम्या

हिमाचल प्रदेशमध्ये सलग तीन दिवस भूकंपाचे हादरे

 

        शिमला- हिमाचल प्रदेशातील मंडी येथे भूकंपचे तीव्र झटके जाणवले. सलग तीन वेळा भूकंप आला होता. मंडी हे भूकंपाचे केंद्र ठरले असून कुल्लू सह इतर जिल्ह्यात सुद्धा भूकंपाचे हादरे जाणवले. हाती लागलेल्या माहिती नुसार हा भूकंप 12 वाजून 1 मिनिट 38 सेकंदानी आला होता. लोकांना भूकंपाची जाणीव होताच ते घरा बाहेर पडले त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. सलग तीन दिवसात तीन वेळा भूकंपाचे हादरे झाले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलोजी ने सांगितले की, मंडी मधील जमिनीपासून खाली 5 किमी खोल अंतरावर भूकंपाचे केंद्र होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!