हॉटेल भाग्यश्री च्या मालकाचे अपहरण करून मारहाण
सध्या सोशल मीडियावर चर्चित असलेलं हॉटेल भाग्यश्रीचे अनेक चाहते आहेत. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या विशिष्ट बोलण्याच्या शैलीमुळे ते सोशल मीडियावर व्हायरल आहे. हॉटेल भाग्यश्री चे एवढे चाहते झाले आहेत की काही दिवसाआधी हॉटेल भाग्यश्री च्या मालकाला बाउन्सर ठेवावे लागले होते. बुधवारी हॉटेल भाग्यश्री च्या मालकासोबत एक अनुचित प्रकार घडला. हॉटेलमध्ये आलेल्या आज्ञातांनी सेल्फी काढच्या काढण्याच्या बहाण्याने बोलून गाडीमध्ये ओढले. ही घटना साडेसातच्या सुमारास घडली. नागेश मडके असे हॉटेल मालकाचे नाव असून रात्री त्यांना अपहरण करून गाडीतून घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना गाडीतच मारहाण करत आता याला जिवंत सोडायचं नाही अशी धमकीही दिली. हॉटेल पासून पाच किलोमीटर असणाऱ्या सिद्धेश्वर पुलावर त्यांना गाडीतून बाहेर फेकून देण्यात आले. 15 दिवसात ही दुसरी घटना घडली असून त्याआधी त्यांना धमकीचा फोन आला होता. काल घडलेल्या घटनेची पोलिसांनी दखल घ्यावी व सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी नागेश मडके यांनी केली आहे
