महत्त्वाच्या बातम्या

हॉटेल लेक व्यू येथे जावली विधानसभा भाजपा सदस्य नोंदणी अभियान

      हॉटेल लेक-व्यू  सातारा येथे पार पडलेल्या जावली विधानसभा भाजपा सदस्य नोंदणी अभियांनांतर्गत प्रदेश भाजपाच्या अभियान संयोजक आमदार उमाताई खापरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जावली मंडल अध्यक्ष श्रीहरी गोळे, सरचिटणीस श्री नितीन गावडे सर, मारुती चिकणे, सातारा शहर सरचिटणीस चंदन घोडके, सातारा लोकसभा समन्वयक श्री सुनिलतात्या काटकर, विधानसभा संयोजक अविनाशदादा कदम, अभियानाचे सातारा विधानसभा प्रभारी महामंत्री श्री जयकुमार शिंदे, प्रदेश महिला उपाध्यक्षा सौ. सुवर्णाताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे साहेब, मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ बापू, माजी सभापती सौ. सरिताताई इंदलकर, सौ. अरुणाताई शिर्के, सौ. सुनिशा शहा कांचनताई साळुंखे, सातारा माजी नगराध्यक्ष  रंजनाताई रावत सातारा शहर अध्यक्ष श्री विकास गोसावी, सातारा ग्रामीण तालुकाध्यक्ष महेशजी गाडे व सातारा जावली विधानसभेतील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
     सातारा जावली विधानसभेत जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचे लक्ष्य निर्धारित करून प्रत्येक बूथ मध्ये किमान 200 सभासद नोंदणीचे उद्धीष्ट सर्वांनी निश्चित केले.
जयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविक केले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, अविनाश दादा कदम आमदार उमाताई खापरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्रीहरी गोळे व कविताताई कचरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!