३२ पोलीस ठाण्यामध्ये अक्षय सोनवणे नं १; ना.जयकुमार गोरेंकडून सन्मान.
सपोनि. अक्षय सोनवणे यांनी सातारा जिल्यातील ३२ पोलीस ठाण्यामध्ये दहिवडी पोलीस ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी बनविल्याबद्दल राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांनी सपोनि. अक्षय सोनवणे यांचा सन्मान केला.
दहिवडी येथील आदर्श विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ना. जयकुमार गोरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर माण तालुक्याचे सुपुत्र आदर्श शाळेचे माजी विद्यार्थी व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे प्रमुख पाहुणे होते.यावेळी ना. गोरे यांनी सपोनि. अक्षय सोनवणे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांचा सन्मान केला.
सपोनि. अक्षय सोनवणे यांच्या आदर्श कामगिरीमुळे दहिवडी या तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये व महाविद्यालये आहेत त्यासाठी तालुक्यातून हजारो युवती येत असतात.त्यांची सुरक्षा कायमच अबाधित राहिली आहे.त्यांचे प्रश्न देखील तातडीने सोडविल्यामुळे माता भगिनी त्यांच्या कामगिरीवर खुश आहेत. रोडरोमिओवर मोठी कारवाई केल्यामुळे रस्त्यावरचे भिरकीट बंद झाले आहे.
फाळकूट दादांना घडविली अद्दल
दहिवडी शहरातून बुलेट व अनेक गाड्यांचे सायलनसर काडून मोठ्याने आवाज करत भरधाव वेगाने गाड्या चालवीणाऱ्यांची पायी गाडी चालवत मिरवणूक काढली होती. त्यामुळे भुरट्या व फाळकूट दादांना चाप बसविला आहे.
माण तालुक्याच्या सुरक्षेसाठी सपोनि.अक्षय सोनवणेच हवेत.
अक्षय सोनवणे हे दबंग व कर्तव्यनिष्ठ व सामान्य जनतेला न्याय देणारे अधिकारी असल्यामुळे सामान्य जनता त्त्यांच्या कामगिरीवर सुरक्षित व खुश आहे. त्यामुळे सोनवणे साहेब कधीच बदलू होऊन जाऊ नयेत अशी भावना माण तालुक्यातील जनतेची आहे.
