महत्त्वाच्या बातम्या

     ॲड. स्वप्नील पाटील यांनी शंभर विद्यार्थ्यांना दाखवला छावा

      ॲड. स्वप्नील पाटील यांच्याकडून शिराळा तालुक्यातील शंभर विद्यार्थ्यांना छावा चित्रपट स्वखर्चाने शिवपार्वती चित्रमंदिर इस्लामपूर येथे दाखवण्यात आला. शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित ‘छावा’ चित्रपट देशभर चर्चेत आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा जीवनपट पहिल्यांदाच बॉलिवूडकडून भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील छावा चित्रपटाचे कौतुक केले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्याग, बलिदान विद्यार्थ्यांना कळावे यासाठी ॲड. स्वप्नील पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवला. यावेळी योगेश गायकवाड (फौजी) यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. थिएटर परिसरात विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा देण्यात आल्या. प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र म्हणण्यात आला. चित्रपटावेळी विद्यार्थ्यांच्यात उत्साहाचे वातावरण होते. यावेळी हणमंत खोत, साहिल पाटील, गणेश पाटील, श्रीधर – पाटील, शुभम पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!