महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात जीबीएस रुग्णसंख्या वाढली; आयसीयू बेडची कमतरता

  पुण्यात GBS या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. 5 जानेवारीपासून 205 रुग्णांची नोंद झाली, त्यातील 50 जण आयसीयूमध्ये असून 20 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

 रुग्णालयांवर ताण

सरकारी रुग्णालयात आयसीयू बेड कमी पडू लागले आहेत.
आरोग्य विभाग आणि रुग्णालय प्रशासन उपाययोजना करत आहे.
नवले रुग्णालयात 20 जानेवारीपासून GBS रुग्णसंख्या वाढली आहे.

खाजगी रुग्णालयात एक डोस ₹20,000 खर्च येतो

सरकारी रुग्णालयात महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत उपचार मिळतो.
त्यामुळे अनेक कुटुंबे सरकारी रुग्णालयांचा आधार घेत आहेत.

गंभीर परिस्थिती

काही रुग्णांना श्वसनसंस्था बंद पडण्याचा धोका आहे.
डायलिसिस आणि हृदयरुग्णांवरही दबाव वाढतोय.
आरोग्य यंत्रणेला तातडीने आणखी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!