महत्त्वाच्या बातम्या

शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष – लाखो शिवभक्तांची उपस्थिती, फुलांनी सजलेला किल्ला

     आज संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यामुळे शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त भव्य उत्सव साजरा केला जात आहे.या सोहळ्यासाठी संपूर्ण किल्ल्याला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचा पाळणा अत्यंत सुंदर फुलांनी सुशोभित करण्यात आला आहे. संपूर्ण किल्ला “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी दणाणून गेला आहे.काल रात्रीपासून अनेक शिवभक्त मशाली घेऊन किल्ल्यावर दाखल झाले आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. लाखो शिवभक्त शिवनेरीवर दाखल झाले असून, या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!