महत्त्वाच्या बातम्या

मार्डीचे माधव राऊत भारत युवा गौरव पुरस्काराने सन्मानित 

 

  माण तालुक्यातील मार्डी गावातील सामाजिक कार्यकर्ते माधवराव राऊत यांना इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा, राष्ट्रीय सरपंच संघटना नवी दिल्ली, आणि बाबू जगजीवनराम कला संस्कृति साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने भारत युवा गौरव अवार्ड 2025 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

    माधवराव राऊत यांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता अभियान, कोरोना काळात केलेले सामाजिक काम, स्मशानभूमी स्वच्छता, व सिमेंटची बाकडी वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, इत्यादी बरीच समाज उपयोगी कामे केलेली आहेत.याच कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

        गोवा येथे कला संस्कृती विभाग संस्कृती भवन येथे 9 वे जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा गौरवशाली सन्मान सोहळा विविध क्षेत्रातील सद्गुनी आणि प्रतिभावान व्यक्ती संघटनाची प्रभावी आंदोलन उत्कृष्ट प्रदर्शनासाठी 16 फेब्रुवारी 2025 रोजी कला आणि संस्कृती विभाग संस्कृती भवन पाटो पणजी येथे पार पडला. त्यामध्ये माधव राऊत यांना भारत युवा गौरव अवॉर्ड 2025 सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर साहेब, लातूरचे मा. खासदार डॉ. प्राचार्य सुनील गायकवाड, डॉक्टर संदीप खोचर, ज्योतिषी प्रेरकवक्ता मुंबई डॉक्टर बी एन खरात, मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, प्राचार्य गोरख साठे, चित्रपट अभिनेते डॉ. झाकीर खान, गोवा राज्याचे प्रसिद्ध उद्योगपती विजय कळमुनकर, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे माण खटावचे नेते मा. शेखरभाऊ गोरे,मा. शंकरराव गायकवाड साहेब, दहिवडी नगरपंचायत च्या बांधकाम सभापती सुरेखाताई पखाले, दहिवडी नगरपंचायतचे नगरसेवक रुपेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते किरणजी भांगे, अण्णासाहेब सुरवसे, इत्यादींनी अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!