महत्त्वाच्या बातम्या

विमाननगर झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीत दोन गटांत हाणामारी, पोलिसांनाही धक्काबुक्की

     पुण्यातील विमाननगर भागात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या वसाहतीत दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महेश सिकंदर पारधी आणि त्यांच्या मित्रांसोबत झालेल्या हाणामारीच्या घटनेत 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश पारधी यांच्या फिर्यादीनुसार, 16 फेब्रुवारी रोजी ते आणि त्यांचे मित्र इमारतीच्या तळमजल्यावर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी काही आरोपींनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी हॉकी स्टिक आणि दगडांचा वापर करून मारहाण केली तसेच परिसरात दहशत माजवली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  याच प्रकरणात झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीत राहणारे यासीनियाजुद्दीन शेख यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात दुसरी फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, किरकोळ वादातून काही जणांनी शस्त्र उगारले, वार केले आणि दहशत माजवली. तसेच काही आरोपींनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!