कराड तालुक्यातील लॅब मध्ये नागरिकांची फसवणूक
कराड तालुक्यात स्थानिकांची लॅब मध्ये फसवणूक होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. कराड तालुक्यात असणाऱ्या लॅबचे प्रमाणपत्र तसेच परमिशन रिन्यू केली की नाही ह्याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .कराड तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. त्या आर्थिक लुटीच्या पाठीमागे अनेक लोकांना त्याचा पुरदंड सहन करावा लागत आहे . लॅब मध्ये कोणतेही दरपत्रक लावलेले नसते ते दरपत्रक तात्काळ लावण्यात यावे तसेच सामान्यांची फसवणूक थांबवावी तसेच अधिकाऱ्यांमार्फत पूर्ण पणे त्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करावी आणि जी रुग्णांची नागरिकांची लूट होत आहे ती लूट तात्काळ थांबवावी अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सातारा जिल्हाध्यक्ष किरण दादा बगाडे ह्यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यासाठी चे निवेदन आरोग्य विभाग पंचायत समिती कराड यांच्याकडे देण्यात आले आहे.
