महत्त्वाच्या बातम्या

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा, फसवणुकीप्रकरणी न्यायालयाचा निर्णय

    राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे अडचणीत आले आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हा गुन्हा १९९५ सालचा असून, कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर ठेवण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. या आरोपांनुसार, भारतीय दंड संहितेच्या ४२० (फसवणूक), ४६५ (खोटी कागदपत्रे तयार करणे) आणि ४७१ (बनावट कागदपत्रांचा वापर) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सर्व पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांना दोषी ठरवले. त्यानुसार, दोघांना दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदावर असलेल्या माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्याने त्यांच्या राजकीय भविष्यासंदर्भात वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. या निर्णयाविरोधात ते उच्च न्यायालयात अपील करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!