महत्त्वाच्या बातम्या

परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणी सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार्

      परळीतील प्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सक्रिय झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी त्यांनी कुटुंबाला आश्वासन दिले की, “तुमच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका.”यानंतर सुप्रिया सुळे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी दोन वेळा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी कुटुंबाला धीर देत सांगितले की, “या प्रकरणाचा योग्य तपास होईल आणि मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन न्यायासाठी प्रयत्न करणार आहे.”ही हत्या नेमकी कुठल्या कारणाने झाली, याचा सखोल तपास व्हावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी सुप्रिया सुळे विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणात काय पुढील पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!