महत्त्वाच्या बातम्या

दहावीच्या मराठी पेपर फुटीमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह सरकारची कठोर कारवाईची घोषणा

       महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात मोठा गैरप्रकार समोर आला. मराठी विषयाचा पेपर परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत बाहेर फुटला. विशेष म्हणजे, हा पेपर झेरॉक्स करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. फक्त २० रुपयांत हा प्रश्नपत्रिका सहज उपलब्ध होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 कसा फुटला पेपर?

बदनापूर येथील परीक्षाकेंद्रातून पेपर बाहेर आल्यानंतर काही लोकांनी त्याचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. हा संपूर्ण प्रकार गुप्तपणे न राहता सोशल मीडियावर पसरला. काही लोकांनी या प्रकाराचे व्हिडिओ शूट करून ते इंटरनेटवर टाकले, त्यामुळे हा प्रकार लगेच उघडकीस आला.

 राज्य सरकारची पहिली प्रतिक्रिया

या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
“कॉपीमुक्त महाराष्ट्र हा आमच्या सरकारचा संकल्प आहे. या पेपरफुटीप्रकरणी संपूर्ण चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता

या पेपरफुटीमुळे परीक्षा व्यवस्थेतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अशा घटनांमुळे मेहनतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

 सरकारची पुढील पावले

   राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आता शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!