श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरीत उत्साहाचा माहोल
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उद्या वाढदिवस असून तो साजरा करण्यासाठी शाहूनगरी सज्ज झाली आहेसर्व आबाल वृद्धांच्या तसेच तरुण पीढीच्या आपल्या हटके स्टाईलने गळ्यातला ताईत बनलेल्या राजांचा वाढदिवस शहरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे आज राजवाडा येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह तर्फे रिक्षा सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर पुणे येथून अनेक रिक्षा चालक सहभागी झाले होते सातारा शहरातील अनेक नागरीकांनी या नटवलेल्या रीक्षा पाहण्यासाठी गर्दी केली होती
संपूर्ण शहरात फ्लेक्सच्या माध्यमातून जनतेने महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर मंदिराबाहेर चा लांब लचक फ्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी .रिमांड होम मूकबधिर शाळा तसेच वृद्धाश्रम या ठिकाणीअन्नदान शालेय शैक्षणिक साहित्य वाटप फळे वाटप अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे
