भाजपाचे पक्ष बांधणीसाठी गाव चलो…घर चलो अभियान
शिराळा: देशाचे पंतप्रधान आदरणीय मा. नरेंद्रजी मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेव यांचे काम, शासनाच्या योजना आणि त्याचवरोवर भाजप पक्षाचे विचार तळा -गाळा पर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने त्याचवरोवर शिराळा विधानसभा मतदार संघांचे आमदार मा. सत्यजित देशमुख (भाऊ) यांच्या पाठीशी संघटनेची मोठी ताकद उभी करणे या हेतू ने भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माजी सभापती मा. हणमंतराव पाटील.भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा. योगेश कुलकर्णी.
यांच्या नेतृत्वात इगझ सदस्य अभियानाच्या माध्यमातून गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे ही मोहीम ग्राऊंड लेवल पर्यंत गावो गावी, घरोघरी राववण्यात आली.. लोकांचे प्रश्न जाणून घेणे, अडी अडचणी सोडवणे लोकांचे भाजप पक्षावद्दल चे मत जाणून घेत ही सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे. पश्चिम भागातील लोकांचा प्रतिसाद चांगला मिळताना दिसत आहे.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मा. प्रदीप पाटील, आरळा उपसरपंच विजय भाडुगडे, विश्वनाथ देशपांडे उपस्थित होते.
