छत्रपती उदयनराजे भोसले यांना चांदीच्या सिंहासना सारखी खुर्ची भेट
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
विशेष म्हणजे, उदयनराजेंच्या प्रति असलेल्या प्रेमातून रामभाऊ देवकर यांनी त्यांना चांदीच्या सिंहासनासारखी खुर्ची भेट दिली. हा सोहळा पुणे, सातारा आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक चाहत्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला आणि महाराजांवरील आपले प्रेम व्यक्त केले.
सातारा आणि पुण्यात मोठा सोहळा सातारा आणि पुण्यात उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तरुण पिढी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रेम व्यक्त करत होती.
