महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सहकुटुंब कुंभमेळ्यामध्ये

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्यात सहभागी होत पवित्र स्नानाचा आनंद घेतला.

       यंदाचा महाकुंभमेळा विशेष असून १४४ वर्षांनी हा योग जुळून आला आहे. या महापर्वात आतापर्यंत ६० कोटी नागरिकांनी स्नान केल्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. या भव्य आयोजनाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विशेष आभार मानले.

     या वेळी त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्यासह मंत्री दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, भरतशेठ गोगावले, उदय सामंत, संजय राठोड आणि मीरा-भाईंदर विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!