महत्त्वाच्या बातम्या

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वडिलांचे निधन

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.

     मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर, कन्या सुरेखा, जावई, सुना, नातवंडं असा मोठा परिवार आहे. भगवानराव गोरे हे माण तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष होते. हसतमुख व सर्वांशी आपलेपणाने वागणारे व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वपरिचित होते.

       भगवानराव गोरे यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी आज २५ फेब्रुवारी  सकाळी ११:०० ते ४:०० वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी (ता. माण) येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यविधी बोराटवाडी येथेच होणार आहे.
 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!