महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोलीत सीआरपीएफ जवानाची आत्महत्या – जिल्ह्यात खळबळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना धानोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली. जवान सीआरपीएफ 113 बटालियनचा होता.

प्राथमिक माहितीनुसार, जवानाने अचानक आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. मोठा आवाज आल्याने सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तो गंभीर जखमी अवस्थेत होता, त्यामुळे तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

सध्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. जवानाने हा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास 113 बटालियनचे कमांडेंट करत आहेत. या घटनेमुळे सुरक्षा दलातही चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!