ग्रामस्थांकडून कै. बंडू तोडरमल यांना अनोखी श्रद्धांजली
‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’या प्रमाणे कोणताही स्वार्थ मनात न ठेवता समाजसेवा करणाऱ्या महामुलकरवाडी ता जावळी गावचे सरपंच कै.राजेंद्र उर्फ बंडू तोडरमल यांच्या पुण्यस्मरणदिनी येथील गावच्या चौकाला ग्रामस्थांनी बंडूदादा चौक असे नाव देऊन अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली.
तब्ब्ल 15 वर्षे बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य व नंतर सरपंचपद असा राजकीय प्रवास करणारे राजेंद्र तोडरमल यांनी या कालावधीत सामाजिक कार्य करत असताना अनेक विकास कामात देखील मोलाचा वाटा उचला आपल्या स्पष्ट देहबोलीने अवघ्या परिसरात बंडू दादा नावाने परिचित होते,प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील व्यक्ती असल्याप्रमाणे त्यांचे अवलिया असे व्यक्तिमत्व होते,कोरोना काळात देखील आपल्या स्वखर्चाने कोरोना रुग्णांना निस्वार्थीपणे मदत केली होती,मात्र गेल्यावर्षी अचानक हृदयविकाराने त्यांचे निधन झाले, सरपंचपदावर असताना झालेली ही घटना अवघ्या परिसराला दुःखात लोटणारी अशीच होती,
मात्र अशा व्यक्तीचे विस्मरन होऊ नये यासाठी गावचे उपसरपंच यशवंत महामुलकर,उमाकांत जाधव व ग्रामपंचायतिचे सर्व सदस्य यांनी महामुलकरवाडी गावच्या वाघजाईनगर परिसरात असणाऱ्या मुख्य चौकाला बंडूदादा चौक असे नाव देण्याचा ठराव घेऊन त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी या नामफलकाचे खरेदी विक्री संघांचे उपाध्यक्ष शरद निकम,सोसायटी अध्यक्ष बाबासाहेब काटकर, उपसरपंच यशवंत महामुलकर, उमाकांत जाधव,ग्रामसेवक रजनीकांत गायकवाड,समाधान जाधव,संजय निकम,समाधान गायकवाड,शिवाजी शिवणकर, धैर्यशील मोहिते,मानसिंग क्षीरसागर, नातेवाईक व ग्रामस्थाच्या हस्ते अनावरण करून कै सरपंच राजेंद्र उर्फ बंडू तोडरमल यांच्या आठवणी चिरंतन ठेवण्याचे काम केल्याने परिसरातुन ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.
कोट
कै.सरपंच राजेंद्र उर्फ बंडू तोडरमल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या मृत्यूनंतर येथील चौकाला त्यांचे नाव दिल्याने बंडूदादा या रूपाने कायमच आपल्या स्मरणात राहणार असून ही त्यांच्या कामाची पोहोच पावती असणार आहे.
