भाजपाचे पक्ष बांधणीसाठी ‘गाव चलो’ अभियान सांगाव बाजारात भाजपाची सभासद नोंदणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम, शासनाच्या योजना त्याचबरोबर भाजप पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने त्याचबरोबर शिराळा विधानसभा मतदार संघांचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी संघटनेची मोठी ताकद उभी करणे या हेतूने भाजपाचे तालुकाध्यक्ष माजी सभापती हणमंतराव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात BJP सदस्य अभियानाच्या माध्यमातून ‘गाव चलो’ अभियान राबवण्यात येत आहे. ही मोहीम गावो गावी, घरोघरी राबवण्यात आली. लोकांचे प्रश्न जाणून घेणे, अडी अडचणी सोडवणे, लोकांचे भाजप पक्षाबद्दलचे मत जाणून घेत ही सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे. ह्या नोंदणीस लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. या मोहिमेत भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अनिता धस, सांगाव गावचे प्रमुख किरण गायकवाड, माजी उपसरपंच सत्यजित पाटील, सागर गायकवाड, दिपक पाटील, संजय गोसावी, मंगेश तिके, टीम सत्यजितचे युवा कार्यकर्ते ही या अभियानात सहभागी झाले होते.
