महत्त्वाच्या बातम्या

भगवानराव गोरेंना  अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला

       महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री यांचे ना. जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाल्याने संपूर्ण माण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बोराटवाडीत जनसागर लोटला. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली . त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर, कन्या सुरेखा, जावई, सुना, नातवंडं असा मोठा परिवार आहे. भगवानराव गोरे हे माण तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष होते. हसतमुख व सर्वांशी आपलेपणाने वागणारे व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वपरिचित होते.
        भगवानराव गोरे यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी २५ फेब्रुवारी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी (ता. माण) येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते.      

       महाराष्ट्रातुन अनेक आमदार व मंत्री उपस्थित होते. त्यामध्ये  खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाठीवर हात ठेवत ना. जयकुमार गोरे यांना दिलासा दिला व त्यांच्या दुःखात सहभागी झाले. त्याचबरोबर ना. राधाकृष्ण विखे-पाटील आ. राहुल कुल, आ. बाबासाहेब देशमुख, आ. सदाशिव सपकाळ,आ. सचिन पाटील,मा. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,मा. खा.रंजितसिंह निंबाळकर, मा. आ. दिनकर पाटील, मा. आ.दिलीपराव येळगावकर, मा. आ. राम सातपुते, हरीश पाटणे, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,विकल्प शहा, ह. भ. प. सागर महाराज बोराटे, श्रीकांत देशमुख, निगडी प्राधिकरण मा. अध्यक्ष सदाशिव खाडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख,राजाभाऊ खरे,आदी उपस्थित होते.

वडिलांच्या निधनाने ना.गोरेंच्या जीवनात पोकळी.

ना. जयकुमार गोरे यांना निवडणुकीच्या कार्यकाळात वडील भगवानराव गोरे यांची मोठी मदत होत असत. आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी अहोरात्र ते मतदार संघ पिंजून काढायचे. चारही वेळा जयकुमार यांना आमदार करताना त्यांचा मोलाचा वाटा होता.मात्र वडिलांच्या जाण्याने जयकुमार गोरे यांच्या जीवनात पोकळी निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!