महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा!

 

आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जे पात्र त्यांना घरे द्या. मी म्हटलं जे राहतात त्या सर्वांना घर द्या. एक घराची किंमत एक कोटी, दोन लाख घरांची किंमत दोन लाख कोटी आहे.

धारावीकारांनी अफवांना बळी पडू नका. तुमचं हित काय, स्वप्न काय ते पाहा”, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीकरांना केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठावर दसरा मेळाव्यातून उबाठा गटावर जोरदार हल्ला केला. मुंबई महानगरपालिकेत सत्ता असताना शिवसेना उबाठाने लूट केली, असा थेट आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जिथे टेंडर तिथे सरेंडर, कंत्राटदारांना सूट देताना जनाची नाही तरी मनाची वाटली पाहिजे होती. गेली २५ वर्षे तुमची मुंबईत सत्ता होती. पण तुम्हाला लोकांशी काही घेणंदेणं नव्हतं. धारावीतील लोक आले आहेत. धारावी हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. पण त्यातही काड्या घालण्याचं काम सुरू आहे. पहिला कंत्राटदार होता तेव्हा मुख्यमंत्री कोण होते ते हि आपल्याला माहिती आहे. त्यांनी कंत्राटदार का रद्द केला सर्वांना माहीत आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा. पण धारावीकरांना त्याच चिखलात, त्याच स्थतीत खितपत ठेवण्याचं पाप तुम्ही करत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जे पात्र धारावीकरांना घरे द्या सांगितले. मी म्हटलं जे धारावीत राहतात त्या सर्वांना घर द्या. दोन लाख दहा हजार नागरिकांना घरं द्या. एक घराची किंमत एक कोटी, दोन लाख घरांची किंमत दोन लाख कोटी आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे. बदल घडला पाहिजे, प्रतीकेच स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. म्हणून आम्ही धारावीकरांच्या पाठीशी आहोत. धारावीकारांनो, अफवांना बळी पडू नका. तुमचं हित काय, स्वप्न काय ते पाहा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी धारावीकरांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!