महत्त्वाच्या बातम्या

उदयाला येतंय नवं महाबळेश्वर…. नवीन महाबळेश्वर विकास प्रकल्पचा आराखडा जाहीर: कोणत्या जिल्ह्याचा असेल समावेश ? 

 
       महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण असलेल्या महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी व पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी नवीन महाबळेश्वर प्रकल्प प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये जावळी, सातारा,महाबळेश्वर आणि पाटण या 4 तालुक्यातील 235 गावांचा समावेश असेल. प्रकल्पाचे विशेष प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावतीने नवीन महाबळेश्वर प्रकल्पचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून हा आराखडा टाऊन प्लॅनिंग, जिल्हाधिकारी, एमएसआरडी च्या नागठाणे कार्यालयात पाहण्यासाठी मिळेल. 
          या विकास प्रकल्पामुळे सुमारे 1953 चौ.किमी क्षेत्राच्या जैविक विकासासह पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास होईल असे सांगण्यात आले आहे. नवीन महाबळेश्वर विकास प्रकल्प हा कोयना धरणाचा शिवसागर जलाशयाशी एकरूप आहे व दक्षिणेकडील कोयना धरण भिंत, हेळवाक , मराठवाडी वाल्मिकी पठारापर्यंत स्थित आहे. 2001 पासून हा प्रकल्प प्रस्तावितच होता. आता एकात्मिक व सर्वांगीण जैवविविधतेच्या व पर्यावरणाच्या विकासासाठी पावले उचलण्यात आली आहेत. हे संपूर्ण क्षेत्र चार भागात विभाजीत केले असून ते उत्तरेकडे महाबळेश्वर , उत्तर- पश्चिम स्थित जावळी,  दक्षिणेकडे पाटण आणि पूर्वेकडे सातारा असे आहे.
         या प्रकल्पासाठी  महामंडळाने संविधानिक प्रक्रिया अवलंबली आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र , कोयना वन्य जीव अभयारण्य, संवर्धन क्षेत्र आणि सातारा प्रादेशिक योजनेतील नियोजन आणि विकासासाठीच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार या क्षेत्रासाठी पर्यावरण संवर्धनाभिमुख व पर्यटन समावेशक विकास योजना तयार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!