महत्त्वाच्या बातम्या

देवरुखच्या विलास रहाटेच्या रांगोळी कलेचे मुंबई विद्यापीठात आकर्षण

मुंबई : देवरुखचा विश्वविक्रमी रांगोळी कलाकार व मुंबई विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि सध्याचा मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाचा कला मार्गदर्शक श्री. विलास विजय रहाटे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबई विद्यापीठाच्या जवाहर नेहरू ग्रंथालय सभागृहात रेखाटलेल्या आकर्षक पोट्रेट रांगोळीचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. सुनील पाटील, ग्रंथपाल डॉ. मोतेवार यांनी कौतुक करून शाबासकी दिली.  

      श्री. विलास रहाटे याची रांगोळी  मुंबई विद्यापीठाच्या अनेक महत्वपूर्ण कार्यक्रमाचा यापूर्वीही विशेष भाग राहिली आहे. विविध दिग्गजांनी विलास राहटेच्या रांगोळी कलेचे कौतुक करून अनेकवेळा सन्मानित केले आहे.

      विलास रहाटे मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक संघाबरोबर कला मार्गदर्शक म्हणून अमेटी विद्यापीठ, नोएडा कॅम्पस येथे ३ मार्च ते ७ मार्च,२०२५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या ३८व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी रवाना होणार असल्याने विलास तसेच संघातील सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शकांना देवरुखवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!