राज्य सरकारचे सर्व पालिकांना आदेश ८ विभागांतील अनधिकृत बांधकामे होणार जमीनदोस्त
नवी मुंबई : फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अनधिकृत बांधकामांबाबत चर्चा झाली असता सर्वांच्या संगनमताने अनधिकृत बांधकामे तोडण्यासंदर्भात १० मार्गदर्शन तत्वे जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार नवी मुंबईतील ८ विभागातील शहरी व गावठाणातील सिडको व पलिकेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. अनधिकृत बांधकाबाबत राज्य सरकारने कंबर कसली असून ज्या ठिकाणीअनधिकृत बांधकामे आहेत त्या ठिकाणी १० मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.
अनधिकृत बांधकामे शोधून तोडा
राज्यातील प्रत्येक महानगर पालिकेला या मार्गदर्शन सूचनेद्वारे राज्य सरकारने पालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामे शोधून ते बांधकाम तात्काळ तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विकासक / भूमाफिया अनधिकृत बांधकाम करीत आहेत त्यांच्या वर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुद्धा राज्य सरकारने दिले आहेत.त्याचबरोबर या अनधिकृत बांधकामामधील रहिवाश्यांना कमी किमतीत भाडे तत्वावर घरे देण्याचे आदेश देण्यात आले,असून अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी अथवा तोडक कारवाई करण्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या १० पट अधिक खर्च हा भूमाफियांकडून वसूल करण्याचे निर्देश सुद्धा मार्गदर्शन तत्त्वांमध्ये जारी करण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून नोटीसा पाठविणे, एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करणे, इमारत पाडण्यासाठी आदेश देणे, सीलबंद आदेश देणे अशा इमारतींना फर्स्ट कम फर्स्ट सव्र्ल्ड बेसिस’ वर कारवाई करण्याची शक्यता आहे.अनधिकृत बांधकामांना कोणत्याही प्रकारची सूट अथवा अभय देता कामा नये. जर कोणत्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने चालढकल करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
