महत्त्वाच्या बातम्या

वाशी कोपरखैरणे येथे खाजगी कंपनीच्या बस विनापरवाना पार्क

नवी मुंबई : पुणे स्वारगेट स्थानकात बंद अवस्थेतील एसटी बस मध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गाजत असताना  मात्र यावर उपायोजना म्हणून सुरक्षितेच्या  दृष्टिकोनातून काही उपाययोजना म्हणून राजकीय नेते मंडळी प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार यांच्यामार्फत चर्चा सत्र झाले.  प्रत्यक्षात मात्र नवी मुंबई मध्ये कुठेही उपाय योजना झालेली दिसत नाही.  
          वाशी कोपरखैरणे रहदारीच्या रस्त्यामध्ये  बऱ्याच खाजगी कंपनीच्या बसेस विनापरवाना पार्किंग असतात यामुळे अनेकदा ट्रॅफिक जामचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागतो. कोपरखैरणे सेक्टर 14  इथे बऱ्याच वर्षापासून एक खाजगी ट्रॅव्हल कंपनीची स्लीपर बस बंद अवस्थेत असून स्वारगेट ची पुनरावृत्ती कोपरखैरणे इथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरामध्ये गर्दुल्ले आणि तळीरामांचा वावर जास्त असून मोबाईल चोरी आणि चैन स्नॅचिंग चे प्रकार घडलेले आहेत.  स्वारगेटची पुनरावृत्ती नवीमुंबईमध्ये झाल्यास याला जबाबदार कोण असणार आहे  ? 
 नवी मुंबईचे पोलीस आयुक्त,नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि कोपर खेरने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी जातीने लक्ष घालून ठोस उपाय योजना  करावी अशी मागणी दिव्यादीप फाउंडेशन नवी मुंबई, चे अध्यक्ष प्रदीप नामदेव म्हात्रे व आनंदस्वरूप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा सौ. वैशाली घोरपडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!