महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील लहान वाहनांना टोल माफ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

 
       मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व लहान मोटार वाहनांना पाचही टोल नाक्यांवर टोल माफ केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज रात्री 12 वाजल्यापासून केली जाईल. आगामी विधानसभेच्या निवडणूकीमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या टोलनाक्यावर लहान वाहनांचा टोल 45 रु केला होता. शहरातील उड्डाणपुलांच्या बांधकामाशी व रस्ते सुधारणांशी संबंधित खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टोल लागू केला होता व दर 3 वर्षांनी टोल वाढीच्या नियमानुसार ही वाढ करण्यात आली होती. वाशी,मुलुंड, पूर्व- पश्चिम , एरोली आणि दहिसर हे मुंबई मधील पाच टोलनाके आहेत.
         विधानसभेच्या निवडणूकीसाठी आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ एकावर एक योजनांची घोषणा करत आहे. याचवेळी शासनाकडून हजाराच्या आसपास शासकीय आदेश काढण्यात आले आहेत. सध्या सुमारे 2 लाख कोटींची आर्थिक तूट असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध खर्चिक निर्णय घेतले जात आहेत. यामुळे सरकार पुढील निधीची तरतूद कशी करणार आहे असा प्रश्न वित्त खात्यास पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!