दहिवडी: महिला दिनाचे औचित्य साधून कोष्टी व्हिजन ट्रस्टतर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन येथील बालाजी मंगला कार्यालयात ११ मार्च रोजी करण्यात आले आहे.या महिला मेळाव्यात खास महिलांसाठीच विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये वैयक्तिक नृत्य (३ मिनिट), समूह नृत्य (५ मिनिट), वैयक्तिक गायन (३ मिनिट), युगुल गीत (३ मिनिट), नाटिका (५ ते ७ मिनिट), फॅशन शो (फक्त ग्रुप) हे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. नाव नोंदणी अनिवार्य आहे. नाव नोंदणीसाठी ९४०३९६८०३१, ७५८८३३६९३३, ९४२१९६५३०१, ९७७३९८१४९०, ७३०४६३०३३०, ९२८४५५६७३९ या नंबरवर संपर्क करावा.