विधानसभेच्या निवडणूक तारखा आज जाहीर होणार…दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
आज दुपारी विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये निवडणूक आयोग महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून निवडणूकाच्या तारखा कधी जाहीर होणार, आचारसंहिता केव्हा पासून लागू होणार अशा प्रश्नात जनता होती. व निवडणुकांची सर्वच वाट पाहत होते. अखेर आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे व दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जातील. त्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होईल.
राज्यातील सर्वच पक्ष निवणुकीसाठी सज्ज आहेत. राज्यात सहा मोठे पक्ष विधानसभा निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना पक्षात फुट पडल्या नंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.त्यामुळे पक्षांप्रमाणेच जनेतेचेदेखील डोळे निवडणुकीवर लागून राहिले आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या जागा वाटपा संदर्भात लवकरच घोषणा करतील. महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यातील निवणुका होतील व झारखंड मध्ये एका पेक्षा जास्त टप्प्यातील निवणुका होतील. झारखंड विधानसभेची मुदत 5 जानेवारी 2025 रोजी तर महाराष्ट्राच्या विधान सभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपेल. त्या आधीच राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे व केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे की, 26 नोव्हेंबर आधीच निवडणुका व निकालाची पूर्तता होईल.
