सुरक्षारक्षकांसाठी प्राधिकरणाची नितांत आवश्यकता!
मुंबई : सुरक्षारक्षकांना न्याय हवा मी सुरक्षारक्षक श्री परमेश्वर बप्पासाहेब देशमुख. छत्रपती संभाजी नगर सुरक्षा रक्षक मंडळात कार्यरत असून, मी आपणास नम्रपणे विनंती करत आहे की, महाराष्ट्र शासन स्थापित सुरक्षारक्षक मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत आहे.
गैरव्यवहारात गुंतलेले काही लोक सुरक्षा रक्षकांवर काही अन्याय झाल्यास त्यांची बाजू घेताना कधीच निदर्शनास येत नाहीत. तसेच या मंडळावर शासनाचे पाहिजे तेवढे नियंत्रण नसल्याकारणाने, अतिशय तुटपुंजा पेमेंट मध्ये सुरक्षा रक्षकांना आपली उपजीविका करावी लागत आहे.तरी शासनास माझी ही नम्र विनंती आहे की, या मंडळातील आर्थिक व्यवहारावर शासनाचे नियंत्रण राहण्यासाठी, व सुरक्षारक्षकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्राधिकरण करण्यात यावे.जेणेकरून हा अधिनियम सुरक्षारक्षकांचे जीवनमान उंचावण्यासाठी 1981 साली शासनाने तयार करून, अमलात आणलेला होता. त्याचा मूळ हेतू साध्य होईल.
सुरक्षा रक्क मंडळ हे 1981 साली स्थापन होऊ नये शासनाच्या काही योजना या मंडळास लागू आहेत, तर काही योजना अद्यापही लागू झालेल्या नाहीत.महत्त्वाची बाब म्हणजे, सर्व 15 जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळे हे एकाच 1981 च्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे नियमन व वितरण अधिनियमानुसार कार्यान्वित असून, वेगवेगळ्या मंडळात वेगवेगळ्या वेळी काही फॅसिलिटी मिळतात, तर काही मंडळात मिळत नाहीत.ही तफावत टाळण्यासाठी प्राधिकरणाची नितांत आवश्यकता आहे.
तसेच 2018 साली पंकज कुमार कमिटीने जो अहवाल सादर केला होता, त्यामध्येही या प्राधिकरणाविषयी उल्लेख आढळून येतो. परंतु त्याची अद्याप पर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.तरी मेहरबान साहेबांनी माझ्या या मेलचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. व सुरक्षा रक्षक मंडळाच्या प्राधिकरणा संबंधित आपल्या पातळीवर योग्य ती कारवाई करावी करावे.
