महत्त्वाच्या बातम्या

दिशा सालियन मृत्यू प्रकरण : वडिलांकडून नव्याने चौकशीची मागणी, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल 

मुंबई : दिवंगत दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी करत त्यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी आणि तपास प्रामाणिक अधिकारी समीर वानखेडे यांच्या देखरेखीखाली केला जावा, अशी त्यांची मागणी आहे.

    याचिकेत दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिच्या मृत्यूनंतर तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना प्रभावाखाली ठेवून प्रकरण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा दावा याचिकेत केला आहे. याशिवाय, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

    मुंबई पोलिस आणि काही राजकीय नेत्यांनी कुटुंबावर दबाव टाकून चुकीच्या पुराव्यांवर विश्वास ठेवण्यास भाग पाडले, असा दावा देखील दिशाच्या वडिलांनी केला आहे.

    दरम्यान, मंत्री नितेश राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणावर हायकोर्टात लवकरच सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!