महत्त्वाच्या बातम्या

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या देशी बैलांची सुटका

शिराळा : मांगले, ता. शिराळा येथून नंदी (देशी बैल) कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती शिराळा तालुक्यातील शरद नायकवडी व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. या कार्यकर्त्यांनी मांगले येथे जाऊन टेम्पो अडवला.

   या टेम्पोमधून सहा नंदी (देशी बैलांची) सुटका करून, कार्यकर्त्यांनी याची माहिती शिराळे पोलिसांना दिली. संशयितांवर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देशी बैल संगोपनासाठी भगवान महावीर गोशाळा (वाघेरी, ता. कराड) पाठवण्यात आले आहेत.

   यावेळी शरद नायकवडी, ऋषीकेश भोसले, अविनाश पाटील, प्रशांत कानकात्रे, प्रवीण गायकवाड, सूरज पवार, बंडा तेली व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!