महत्त्वाच्या बातम्या

पैठण येथे श्री एकनाथ महाराज वाड्यातील ऐतिहासिक रांजण पूजेचा प्रारंभ

पैठण : पैठण येथील श्री एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील ऐतिहासिक रांजण पूजेचा प्रारंभ आज दुपारपासून झाला. संत तुकाराम महाराज बीजेपासून सुरू होणाऱ्या या पूजेसाठी महाराजांचे वंशज व मानकरी यांनी रांजणाच्या मुखाची विधीवत पूजा केली आणि गोदावरी जलाने रांजण भरण्याचा शुभारंभ केला.

     या पौराणिक रांजणाची वैशिष्ट्ये अशी आहेत की त्याचे मुख जमिनीला समांतर आहे आणि त्याची खोली सुमारे १९ ते २० फूट आहे. परंपरेनुसार, श्रीकृष्ण येथे पानक्या म्हणून पाणी भरत होते, अशी श्रद्धा आहे.

    रांजण भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गावातील तसेच बाहेरून आलेल्या श्रद्धाळूंनाही जल भरण्याची परवानगी दिली जाते. या वेळी जो कोणी रांजण पूर्ण भरतो, त्याला विशेष मान दिला जातो. वाजतगाजत त्याची भव्य मिरवणूक काढली जाते आणि संपूर्ण समाजाच्या साक्षीने त्याला गौरवण्यात येते.

    हि ऐतिहासिक व धार्मिक परंपरा शतकानुशतके अखंड सुरू आहे. भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा होणाऱ्या या सोहळ्यात सत्वगुणांची अनुभूती मिळते, अशी श्रद्धाळूंची भावना आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!