महत्त्वाच्या बातम्या

आई-वडिलांची सेवा करण्यासाठी भावांची न्यायालयीन लढाई: हृदयस्पर्शी घटना

गुजरात न्यायालयात एक अनोखा आणि हृदयस्पर्शी खटला समोर आला आहे. वयोवृद्ध आईवडिलांची सेवा करण्यासाठी लहान भावाने मोठ्या भावाविरुद्ध दावा दाखल केला. त्याचा आरोप असा होता की, मोठा भाऊ त्याला आईवडिलांची सेवा करण्याची संधीच देत नाही.

    मोठ्या भावाने गेली २५ वर्षे आपल्या आईवडिलांची अतिशय प्रेमाने सेवा केली. मात्र, आता तो वयस्कर झाला आहे आणि त्यामुळे पुढे सेवा करणे कठीण होईल. त्यामुळे लहान भावाने न्यायालयात याचिका दाखल करून आईवडिलांना त्याच्याकडे सोपवावे, अशी मागणी केली.

    आज वृद्धाश्रमात आईवडिलांना सोडणारी मुले वाढत असताना दोन्ही भावांचे त्यांच्यासाठी न्यायालयात जाणे विलक्षण आहे. जजही आश्चर्यचकित झाले. त्यांनी आईवडिलांचे मत विचारले असता, त्यांनी निर्णय न्यायालयावर सोपवला.

    न्यायालयाने परिस्थितीचा विचार करून आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकताच मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांपासून दुरावल्याचे त्याला प्रचंड दुःख झाले.

    ही घटना आजच्या पिढीला मोठा धडा आहे. आज वृद्धाश्रमात वृद्ध पालकांची संख्या वाढत आहे, शिक्षित उच्चभ्रू मंडळीही कर्तव्य विसरत आहेत. मात्र, या दोन भावांनी दाखवलेली निस्सीम श्रद्धा आणि प्रेम भारतीय संस्कृतीतील आदर्श कसा असावा, हे दाखवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!