महत्त्वाच्या बातम्या

नागपूर हिंसाचार प्रकरण: फहीम खानने जामिनासाठी अर्ज दाखल

नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्याने आपल्या अर्जात, त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत जामिनावर मुक्त करण्याची मागणी केली आहे.

    फहीम खानने हात, पाय आणि पाठ दुखण्याची तक्रार केल्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, सरकारी पक्षाने त्याला पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

    हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (22 मार्च)  नागपुरात दाखल होत आहेत. त्यांनी येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नागपूर हिंसाचाराची सविस्तर माहिती घेतली जाणार असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे.

    यापूर्वी पोलिसांनी 19 जणांना पोलीस कोठडीत घेतले होते. त्यानंतर आणखी 2 जणांना पीसीआर (पोलीस कोठडी) देण्यात आली. काल (21 मार्च) आणखी 17 आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

   सरकारी वकील मेघा बुरंगे यांनी सांगितले की, सध्या फहीम खान न्यायालयीन कोठडीत असला तरी, पुढील तपासानुसार त्याला पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!