महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यात शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन

     साताऱ्यात पर्यावरण पूरक रॅलीच्या माध्यमातुन लोकांमध्ये पर्यावरणाचा संदेश सायकलिंग क्लब कायमच देत असतो. या सर्वांच्या समस्यांचे नक्कीच नियोजन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहु,असे प्रतिपादन नामदार शिंवेंद्रसिहराजे भोसले यांनी केले. सातारा येथील हुतात्मा स्मारकापासून पासून सकाळी सातारा सायकलिंग क्लब यांच्यावतीने सातारा भणंग मार्गे मेढा बाजार चौक ते परत सातारा अशी सायकल रॅलीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले. प्रारंभी संतोष शेडगे व मित्रपरिवार यांच्या वतीने झेंडा दाखवून प्रस्थान करण्यात आले.
    जावळीच्या नयनरम्य परिसरातून ही रॅली जात असता विविध गावच्या लोकांनी स्वागत केले. भणंग येथील मोहन जगताप मित्र परिवार व ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित एनर्जीक पेय व पाणी देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. मेढा याठिकाणी रॅलीचे आगमन होतात सुमधूर संगीत गीतांनी सायकल स्वरांचे एनर्जीच्या पाऊच वाटण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालिका मालन जगताप, रविन्द्र देशमुख, सुहास पाटील, प्रविण गाढवे, विजयकुमार राव, रविन्द्र शिंदे,  भणंगचे सरपंच गणेश जगताप, अनंत जाधव, सचिन जाधव, नागेश साळुंखे, शेखर जाधव महेंद्र जगताप, नथुभाऊ जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. मेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
         यावेळी मेढा व भणंग ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल सायकलिंग क्लबचे संतोष शेडगे, डॉ.सुधीर पवार, अंकित जगताप यांनी धन्यवाद मानले.   सातारा ऑफिसर क्लब येथील सांगता प्रसंगी सातारा शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील आलेल्या सायकल स्वारांचा यावेळी सन्मानित करण्यात आले. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!