शिराळा आगारात नवीन 10 बस दाखल
शिराळा : नुकताच शिराळा आगारात 10 नवीन बस आल्याने मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पूर्ण झाला. त्याच धरतीवर शिराळा तडवळे या ठिकाणी बी एस सिक्स एसटीची नवीन गाडी चे मनोभावे पूजन करून चालक वाहक यांचा टॉवेल टोपी आणि फेटा देऊन मनसन्मान करण्यात आला. यातूनच एसटी विषयी आत्मीयता ठेवत तडवळे गावातील मान्यवर यांनी चालक श्री स्वरूप मिरजकार, वाहक सौ. भोगे मॅडम यांचा सत्कार करून एसटीची मनोभावे हार तुरे घालून पूजन केले. या ठिकाणी तडवळे गावातील मान्यवर सरपंच सौ. प्रियांका पाटील उपस्थित होत्या. उपसरपंच वकील मारुती पाटील (नाना), सुजल कांबळे, अमोल पाटील- महाडिक युवा शक्ती निलेश दाभाडे, संस्थापक जनहित बहुजन कामगार संघ सचिन मोहिते, संस्थापक उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, वर्कशॉप शिराळा आगार महाराष्ट्र एसटी कामगार सेना शिराळा, आगार प्रमुख मार्गदर्शक अब्दुल दिवाण तसेच तडवळे गावातील जेष्ठ ग्रामस्थ बंधू आणि भगिनी यांच्या उपस्थित हा सोहळा परिपूर्ण झाला.
