महत्त्वाच्या बातम्या

संगमेश्वर पोलिसांची धडक कारवाई; कुंभारखाणी येथे १२ हजार रुपयांचा देशी-विदेशी कंपनीचा मद्यसाठा केला जप्त

संगमेश्वर: संगमेश्वर पोलीसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी केली असून तालुक्यातील कुंभारखाणी हुंबरटवाडी येथील राजेंद्र काशीराम सुर्वे (५४) याच्या राहत्या घरी रविवारी सायंकाळी संगमेश्वर पोलिसांनी धाड टाकली असता त्याच्या घराच्या पडवीत १२ हजार ३३५ रुपयाचा देशी विदेशी कंपनीचा मद्यसाठा आढळून आला आहे. हा मुद्देमाल संगमेश्वर पोलीसांनी जप्त केला आहे. 
संगमेश्वर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गेली कित्येक दिवस अवैधरित्या सुरु असलेल्या दारूधंद्याला आळा बसल्याने संगमेश्वर पोलीसांचे विशेषतः परि. पोलीस उप अधीक्षक श्री. शिव प्रसाद पारवे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन होत आहे. कुंभारखाणी हुंबरटवाडी येथे विनापरवाना देशी विदेशी दारु विक्री होत असल्याची खबर संगमेश्वर पोलिसांना मिळाली असता रविवार ता. ६ रोजी सायंकाळी संगमेश्वर पोलिसांनी एका घरावर धाड टाकली. त्यावेळी राजेंद्र काशीराम सुर्वे हा आपल्या राहत्या घराच्या पडवीत देशी, विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला. 
        संगमेश्वर पोलिसांनी पंचांसमक्ष एकुण 12335 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यासंदर्भात संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पो. काँ. श्री. सोमनाथ आव्हाड यांनी रीतसर फिर्याद दिल्याने राजेंद्र सुर्वे याच्यावर विना परवाना देशी, विदेशी मालाचा साठा करणे आणि विक्री करणे या कारणास्तव संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणेत आला आहे. याबाबत अधिक तपास परि. पोलीस उपअधीक्षक श्री. शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. सी. टी. कांबळे करीत आहेत. ही कारवाई केल्याबद्दल संगमेश्वर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!