राधिका रोडवर उघड्या गटारांमुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये राधिका रोडवर करण्यात आलेल्या गटाराच्या कामावर अनेक ठिकाणी जाळया किंवा स्लॅब न टाकल्यामुळे सदरची उघडी गटारे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. या रोडवर असणाऱ्या रिलायन्स मॉल शेजारी असणाऱ्या फेडरल बँकेच्या लगत असणारे हे गटार पाच फूट खोल व अंदाजे चाळीस फूट लांब असून सदर गटर उघडे असल्याने दुर्गंधी पसरली आहे व डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या गटरालगत असणाऱ्या रस्त्यावरून वाहने अत्यंत वेगाने जात असतात त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या ठिकाणी बँक व एका नामांकित वृत्तपत्राचे ऑफिस असल्याने येथे नागरिकांची वर्दळ कायम असते. त्यामुळे सातारा नगर परिषदेने याबाबतीत लक्ष घालून सदर गटार बंदिस्त करावे अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
