पाणी पुरवठा योजना आता सौरऊर्जेवर करा; सरपंच परिषदेची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी
राज्यात अनियमित वीजपुरवठा आणि वीज बिल भरण्यासाठी निधीचा ताण वेळोवेळी उपलब्ध होत असल्याने ग्रामपंचायतीला नियमित आणि पुरेशा पाणी पुरवठा करता येत नाही. यामुळे जनप्रक्षोभाला सरपंच, सदस्यांना सामोरे जावे लागते. पाणी पुरवठा योजना महावितरणला नेट मॅटरिंग करून सौरऊर्जेवर करण्याची गरज आहे. योजना ही सौरऊर्जेवर आधारित पंप कार्यान्वित झाली तर नागरिक पुरेसा, वेळेवर, नियमित पाणीपुरवठा करता येईल. याबाबत शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी सरपंच परिषद, पुणे चे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले , कृषी तज्ञ डॉ.राहूल पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, डीपी जळणे, ग्रामपंचायतीला वीजबिले भरताना आर्थिक ताण निर्माण होतो. यामुळे जर सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर सरपंच, सदस्यांना नाहक त्रास दिला जातो. राज्यातील अनेक ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने वीजबिल भरणे शक्य होत नाही. पाणी पुरवठा योजनाला
विद्युत पुरवठा सौरऊर्जेवर झाल्यास आर्थिक ताण संपून नागरिकांना नियमित तो होऊ शकेल. याबाबत ग्रामविकास मंत्र्याशी सविस्तर चर्चा झाली.यासाठी काही निधी शासनाकडून तर उर्वरित निधी वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्याबाबत विचारविनिमय झाला. याबाबत विभागांतर्गत कायदेशीर बाबींची तपासणी करून तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर पाटील (आबा) यांनी राबवलेल्या यशवंत ग्रामसमृद्धी योजनेच्या धर्तीवर सदर योजना करण्याचे ठरले शासन स्तरावरून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये पाणी पुरवठायोजनांसाठी सौरऊर्जवर आधारित पंप प्रणाली कार्यान्वित करणे, हा उत्तम पर्याय होऊ शकतो. सौर ऊर्जेच्या वापरामुळे नियमित पाणी पुरवठा होईल, वीज बिलातून मुक्तताः मिळेल , ग्रामपंचायतीची आर्थिक बचत होऊन तो शिल्लक निधी ग्रामविकास योजनांसाठी वापरला जाऊ शकतो. हरित ऊर्जा वापरल्याने कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल.
