उल्हासनगरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न
भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सुभाष टेकडी चौकात अर्धपूर्णाकृती पुतळा होता . त्याजागी डॉ.बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्याकडे केली होती . शिवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप डोंगरे यांनीही याकडे किणीकरांचे लक्ष वेधले होते. तसेच डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीने सर्वांना निमंत्रण देत 10 एप्रिल रोजी शिवसेनेचे खासदार डॉ . श्रीकांत शिंदे , आमदार डॉ . बालाजी किणीकर यांच्या पुढाकाराने उल्हासनगर कॅम्प 4 येथील सुभाष टेकडी चौकात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळाचे अनावरण करण्याचे ठरवले.
या पुर्णाकृती पुतळा साठी शासकीय एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता . पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष समाजसेवक माजी नगरसेवक अन्य सदस्यांनी पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी केली होती . सदरची मागणी लक्षात घेवून आमदार डॉ . किणीकर यांनी शासकीय स्तरावर धावपळ करुन सर्व मंजुरी मिळवून पुतळा स्मारकासाठी 1 कोटी निधी मंजूर करुन घेतला . पुतळा स्मारक तयार होऊन अनेक दिवस उलटले तरी पुतळ्याचे अनावरण होत नसल्याने स्थानिक आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती व आता आमदार डॉ.बालाजी किणीकर आणि महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे आणि पुतळा स्मारक समिती यांच्या पुढाकाराने 10 एप्रिल रोजी पुतळा अनावरणाची तारीख निश्चित करण्यात आली आणि या दरम्यान पुतळ्याचे अनावरण भंते डॉ . एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते झाले असून आमदार डॉ . बालाजी किणीकर , पुतळा स्मारक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते व जास्त प्रमाणात अंबेडकर अनुयायी सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि मोठया आनंद उत्सहाने अनावरण सोहळा येथे संपन्न झाला.
