महत्त्वाच्या बातम्या

पलपब प्रकाशन संस्था, अहमदाबाद यांचा २०२५ चा राज्यस्तरीय साहित्य भुषण पुरस्कार जाहीर

   पलपब प्रकाशन संस्था, अहमदाबाद आयोजित ११ में रविवार रोजी ‘अजिंक्य साहित्यसंगम’ हे साहित्य संमेलन स्वराज्य कॉन्फरन्स हॉल, सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेमार्फत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. लिना पाटील, संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री किरण तोडकर, संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री संदीप पवार, पलपब सातारा जिल्हा अध्यक्ष विजय कदम व सातारा जिल्हा समिती द्वारे *राज्यस्तरीय पलपब साहित्य भूषण २०२५ साठी  काव्यसंग्रह, कथासंग्रह, आणि आत्मचरित्र या प्रकारात साहित्याचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात काव्यसंग्रह प्रकारात ४७, कथासंग्रह प्रकारात ३३ तर आत्मचरित्र प्रकारात ६ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या सर्व प्रस्तावातून संस्थेच्या निवड समितीने आत्मचरित्र प्रकारात लेखक श्री दत्तात्रय हिरलेकर गुरुजी यांचे “कर्तव्यपूर्ती” हे आत्मचरित्र तर लेखक श्री आनंद ननावरे यांच्या “क्षण आनंदाचे” हा कथासंग्रह आणि कवी श्री गणेश आटकाळे यांच्या “शोधक” या काव्यसंग्रह पलपब साहित्य भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. तसेच लेखक श्री. अजित क्षिरसागर यांच्या “जीवनचुका – एक संधी” या कथासंग्रहासाठी उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले.

        पलपब संस्था तसेच पुर्ण पलपब सातारा समितीच्या वतीने सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करण्यात आले. सर्वच साहित्यिकांचे पुरस्कारासाठी प्राप्त झालेले साहित्य वाचण्याजोगे आहे, त्यासाठी त्यांचे संस्थेच्या वतीने आभार तसेच त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचाली साठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. सदर पुरस्कार दि. ११ में २०२५ रविवार रोजी स्वराज्य कॉन्फरन्स हॉल, सातारा येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येतील असे संस्थेमार्फत तसेच सातारा जिल्हा समिती द्वारे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!