व्हिडीओ शूटिंग केल्याच्या रागातून होमगार्ड ला मारहाण
दरे तर्फे परळी ता सातारा या गावच्या यात्रेत जुन्या वादातून ग्रामस्थ यात्रा कमिटीचे सदस्य व सुधीर जाधव यांच्यात वादावादी झाली. यावेळी बंदोबस्त असणारे होमगार्ड श्रीधर भोईटे यांनी सदर घटनेचे मोबाईल द्वारे चित्रीकरण केले. सदर घटनेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केल्याचा राग मनात धरून नितिन अडागळे, मोहन तानाजी जाधव, वाल्मीक गोडसे, नवनाथ जयसिंग जाधव, चंद्रकांत हणमंत पवार, सूर्यकांत धोंडीराम तुपे, संतोष गुलाबराव जाधव व दोन महिला सह 15 ते २० जणांनी होमगार्ड श्रीधर भोईटे यांना मारहाण केली. व त्यांचा मोबाईल हिसकावून त्यातील संबंधित वादावादीचे फोटो डिलीट केले.या प्रकरणात सातारा तालुका पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. सदर घटना पाहता खाकी वर्दीचा धाक कमी होतोय अशी भीती वाटू लागली आहे.
