विठ्ठलाच्या पादुका होणार लंडनला रवाना
भेटी लागे जीवा लागलीसे आस या तुकाराम महाराजांच्या अंभगातील ओवी प्रमाणे लंडन स्थित महाराष्ट्रातील लंडनस्थित पांडुरंग भक्तांना विठ्ठलाच्या भेटीची ओढ कायम लागत असते परंतू दूरदेशी असल्याने ही आस पूर्ण होत नव्हती म्हणूनच लंडन येथील पांडुरंग भक्तांनी चक्क लंडनमध्ये पांडुरंगाच्या पादुका स्थापन करण्याच्या उद्देशाने चक्क पंढरपूर ते लंडन वारी काढण्याचा निर्णय घेतला व त्याची सुरुवात काल पंढरपूर येथून झाली.
सदरची वारी ही 65 दिवसाची असून 22 देशातून चारचाकी वहानातून 18 हजार किमी प्रवास करणार आहे. सदर पादुकांची विधिवत पूजा झाल्यानंतर पादुकांनी प्रस्थान ठेवले. सदर पादुका पुणे -नागपूर-मध्यप्रदेश-उत्तरप्रदेश मार्गे देशाबाहेर पडणार असून या पादुका लंडनला रवाना होतील. अशा पादुका जगभर स्थायिक झालेल्या सर्व महाराष्ट्रीयन व्यक्तीने स्थापन कराव्या असे संयोजकांनी सांगितले पादुका ज्या वाहनातून नेण्यात येणार आहेत त्या वाहनावर दोन्ही बाजूला पालखी मार्गे थोडक्यात पंढरपूर ते लंडन मार्गे दाखवण्यात आला होता. पालखी मार्गावर पालखी दर्शनासाठी भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
