सुरूरच्या बगाडयात्रेस रविवार पासून प्रारंभ
वाई : सुरूर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची बगाड यात्रा रविवार दि २० व सोमवार दि. २१ रोजी होणार आहे. त्यानिमित्त बगाड मिरवणूक, पालखी, छबिना, तमाशा, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम होणार आहेत. रविवारी सकाळी नऊ वाजता बगाड बैलजोड्या जुंपून गावापासून २ किलोमीटर शिवारात नेण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता देवांची पूजा करून बगाड्याला बगाडाला टांगण्यात येणार आहे. यावर्षी बगाड्याचा मान दत्तात्रय नलावडे यांना मिळाला आहे. बगाड ओढण्यासाठी बैलांच्या जोड्या जोडण्यात येऊन वाद्यांच्या निनादात मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. दिवसभर बगाडाची मिरवणूक काढल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान गावात आणले जाणार आहे. यानंतर रात्री आठ वाजल्यापासून भैरवनाथाची पालखी व छबिना निघणार आहे. सोमवार दि.२१ रोजी सकाळी १० वाजता काळूबाळू यांचा लोकनाट्य तमाशा, तसेच दिनांक मंगळवार २२ रोजी आर्केस्ट्रा होणार आहे.
