महत्त्वाच्या बातम्या

आंधळीतील महाजनआरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद 

 आंधळी येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने प्रेम फाउंडेशन व ग्रामपंचायत आयुष्यमान आरोग्य मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.१६ रोजी आंधळी ग्रामपंचायत समोर आयोजित महा.जन आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ  या शिबिरामध्ये एकूण रक्तदाब व मधुमेह तपासणी २७० नागरिक लीव्हर फंक्शन टेस्ट (LFT)१४०, किडणी फंक्शन टेस्ट (KFT) ११९, रक्तातील साखर (BSL )२७०, ई.सी.जी.(E.C.G.) १३० इत्यादी नागरिकांच्या तपासणी घेण्यात आल्या.

        यासाठी दहिवडी व परिसरातील नामांकित डॉ. अजय डॉ. राहुल दोलताडे , डॉ. चैतन्य कारंडे , डाॕ.सचिन गाडे, समुदाय आरोग्य अधिकारी,डाॕ.विजय लोखंडे समुदाय आरोग्य अधिकारी, सुजित खाडे, समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका हर्षदा जाधव, स्वाती भुजबळ, राणी झगडे, गायत्री लोहार, सीमा सत्रे यांनी मोलाचे सहकार्य केले. या शिबिराचे उदघाट्न अर्जुन तात्या काळे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे, मीनाक्षी काळे, डी.एस.भाऊ काळे, घनश्याम काळे, संदीप सुतार, दत्ता गोरे, धनाजी काळे, बापूराव काळे, तानाजी काळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!